Wednesday, August 17, 2022

नगर जिल्ह्यात या तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

.

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात संत सावता माळी पुण्यतिथी, मोहरम सण उत्सव, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 

पुण्यतिथी व नागपंचमी सण उत्सव हे सण व उत्सव साजरे होणार आहेत. तसेच नगर पंचायत व नगर पालिका निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा

प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जिल्हयात सार्वजनिक शांतता किंवा सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांनी त्यांना प्राप्त झालेल्या

अधिकाराचा वापर करून अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत कलम ३७(१)(३)चे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कोणाही इसमास पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

 

शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारीरिक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा

स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, किंवा जमा करणे किंवा तयार करणे,

 

व्यक्तीचे अथवा मृतदेहाचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा

ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे, किंवा बिडंबन करणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू

तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा प्रसार करणे.शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे .

 

तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे, धार्मिक कार्यक्रम, विहीत प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने आयोजित निवडणूक प्रचार सभा अशा व्यक्तींना सदरचा आदेश लागू होणार नाही.

 

प्रस्तुतचा आदेश अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत २७ जुलै,२०२२ रोजीचे ००.०१ वाजेपासून १० आॉगस्ट,२०२२ रोजी

 

२४.०० वाजेपावेतोंचे कालावधीत जारी राहील असे जिल्हादंडाधिकारी डॉ. राजेन्द्र ब. भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

 

 

ताज्या बातम्या

error: Content is protected !!