माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (26 जुलै) 11 हजार 204 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती.
यावेळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो 111 ते 257 रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो 76 ते 110 रुपये भाव मिळाला.
कांदा लिलावात एक नंबरच्या कांद्याला प्रति क्विंटल 1101 ते 1500 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.राहाता बाजार समितीत
मंगळवारी शेतकऱ्यांनी 11 हजार 204 क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो सर्वाधिक 111 ते 257 रुपये भाव मिळाला.
दोन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 76 ते 110 रुपये, तीन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 36 ते 75 रुपये, तर चार नंबरच्या डाळिंबांना 10 ते 35 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील
दोन दिवसांच्या तुलनेत राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या भावात किलोमागे 100 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले.राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याचे लिलावही झाले.
यावेळी 13 हजार 861 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1101 ते 1500 रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला 701 ते 1100 रुपये भाव मिळाला.
तीन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 550 ते 750 रुपये, तर जोडकांद्याला 100 ते 300 रुपये
भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.