शेवगाव/सुखदेव फुलारी
म्हणतात ना वाढप्या ओळखीचा असला तर पंगतीच्या अगदी शेवटच्या टोकाला बसलेल्या माणसालाही भरपूर वाढ मिळते.तसेच काही झाले ते शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले यांचे बाबतीत.
शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले यांच्या पाच वर्षातील विकासकामांचा सपाटा सर्वांनाच माहीत आहे.पाच वर्षाचे कालावधी त्यांनी शेवगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेवटच्या गावापर्यंत विकास कामे पोहचवली.हे करत असताना वडील माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व चुलते माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या राजकिय वारसाचा किंवा वजनाचा कुठे ही बडेजाव त्यांनी दाखविला नाही.जेथे जातील येथील लहान-थोर, वडीलधारी-तरुण मंडळीच्या कोंडाळ्यात वावरूनच जनेतचे प्रश्न सोडावीत आहेत.
नुकताच त्यांचे साधेपणा अनुभवयास मिळाला.सोनविहीर येथील गैबीसाहेब दर्गा येथे सुरू असलेल्या महाप्रसाद पंगतीमध्ये भाविकांना वाढण्याचे काम केले. पंगतीमध्ये बसलेल्या चिमुकल्या बालगोपाळासह सर्व भाविकांची आदराने विचारपूस करत प्रसाद वाढला.पंगत वाढवून झाल्यावर स्वतः सर्वसाधारण नागिरकांप्रमाणे पंगतीत बसुनच प्रसाद घेतला.
गैबीसाहेब दर्गा येथे दर्गासाठी भाविक व ग्रामस्तांनी सभापती साहेबांकडे पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स मागणी केली होती. ३ महिन्यात मागण्यापूर्ण करून आज लोकार्पण देखील केले.
कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी गैबीसाहेब दर्गावर चादर चढवून दर्शन घेतले. घुले घराण्याची सर्वसामान्यांशी जोडलेली नाळव साधेपणा हे उपस्थितांना भावले.