Saturday, September 23, 2023

दहावी उत्तीर्णांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून आता…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज प्रत्येकालाच इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे वेड आहे.

याच्या तयारीसाठी आता सरकारकडून भरीव मदत केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे बार्टीकडून दोन लाख रुपये भरीव मदतीची योजना आखली होती. मात्र ती काही

कारणाने बंद करण्यात येऊन आता दर्जेदार संस्थेकडून मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही योजना अनुसूचित जातीसाठी आहे. तर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीकडून जेईई आणि नीटसाठी प्रशिक्षण दिले

जाणार आहे. विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.दहावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या अनूसुचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी मागील सरकारने डाँ. बाबासाहेब आंबेडकर विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती.

या योजनेमार्फत प्रत्येकी दोन लाख रुपये विद्यार्थ्यांना मिळणार होते. तत्कालीन सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी ही प्रक्रिया न राबवता शिकवणी वर्ग सुरू करावे अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर

परत गोंधळ झाला. ही योजना एक किंवा दोन वर्षांची करायची? या मागणीसाठी हे प्रकरण परत रेंगाळले. आता पुन्हा निविदा राबवून शिकवणी वर्गांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर मुलांना अर्ज करता येईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!