माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महसूल विभागात तलाठी गट ‘क’ संवर्गातील पदांसाठी मोठी भरती जाहिर केली आहे.
राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती होणार आहे. २३ जून पासून शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) पद्धतीने या पदांसाठी फाॅर्म भारत येणार आहे.
तर १३ जुलै ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख असणार आहे. ऑनलाईनच या पदभरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे.एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार
तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी,
सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे.
या भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.