माय महाराष्ट्र न्यूज:तेलंगणा राज्यातील बीआरएस पक्षाची महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच धास्ती घेतलेली दिसतेय.कांदा दराबाबत काही लोकांनी चुकीचा व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांची दिशाभूल करणे हे एक राजकीय षडयंत्र रचत आहेत .
या संदर्भात हैदराबाद येथील कांदा मार्केटमध्ये स्वतः माजी आमदार हर्षवर्धन जाधव जाऊन होऊन खरी परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी गेले आहेत. या ठिकाणी तेथील व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्या ठिकाणी हैदराबादला कांदा कसा घेऊन जायचा हे देखील सांगितले आहे.
कांदा विक्री बाबत त्या ठिकाणी अपेक्षित कांदा कशा प्रकारचा घेऊन जायला हवा तसेच याबाबत त्याचे वर्गीकरण सिंगल पत्ती डबल पत्ती हे देखील सांगितले. त्यानुसार बाजार भाव सांगितले आहेत. महाराष्ट्र राज्यापेक्षा तेथील कांद्याचे बाजारभाव हे नक्कीच जास्त आहेत.
यावेळी हैदराबाद कांदा मार्केटला त्यांच्यासोबत काही निपाणी येथील शेतकरी उपस्थित होते.कांदा विक्री बाबतचे एका वायरल व्हिडिओच्या अनुषंगाने वास्तव जर बघितले तर त्या संबंधित शेतकऱ्याने आपला शेतमाल त्या व्हिडिओमध्ये न दाखवताच खाली
बोलतानाचा व्हिडिओ मांडून सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. तसेच या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कांदा अपेक्षित आहे याचाही विचार आपण करायला हवा या सर्वांचा विचार करत असता या ठिकाणी याआधी अनेक शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली. त्यात
त्यांना चांगला भाव मिळाल्याचे बातम्या अनेक समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्वस्थता पसरली आहे. हीच धास्ती घेऊन त्या अनुषंगाने हा जो व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमांमध्ये फिरत आहे. हे एक
राजकीय षडयंत्र म्हणावं लागेल. अशा प्रकारचा अपप्रचार थांबवला पाहिजे भारत राष्ट्र समिती पक्ष हा केवळ शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कासाठी व हितासाठी काम करत असून शेतकऱ्यांची फसवणूक करणे हा हेतू नसून काही राजकीय प्रवृत्ती या ठिकाणी
आपल्या विकृत विचारांच प्रदर्शन करताना दिसत आहेत.त्या अनुषंगाने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील कांदा मार्केट मधील शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करतानाचा व्हिडिओ तसेच हर्षवर्धन जाधव यांचा प्रत्यक्ष वास्तव पाहणी दौरा व भारत राष्ट्र समितीची
भूमिका शेतकरी हिताची तेलंगणातील कांदा विक्री विषयी राज्यात कोणीही संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन भारत राष्ट्र किसान उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब बच्छाव यांनी केले असे ३ व्हिडिओ जरूर पाहावेत.