माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समिती (बी.आर.एस.) पार्टी ची लोकप्रियता प्रचंड वाढत आहे. महाराष्ट्रातील अनेक नेते व प्रसिद्ध व्यक्ती बी.आर.एस. पार्टी मध्ये प्रवेश
करत आहे आणि महाराष्ट्रात प्रचंड मोठे यश पार्टीला मिळत आहे. भारत राष्ट्र समितीने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये विस्तार केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व जनतेच्या उद्धारासाठी त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे औचित्य साधून के. चंद्रशेखर राव हे त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. उद्या
दिनांक २७ जून २०२३ रोजी दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांचा पंढरपूर मध्ये बी आर एस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश पण होणार आहे. केसीआर यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ते काहीवेळापूर्वीच
धाराशिवच्या उमरगा येथे दाखल झाले त्यानंतर त्यांनी शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला. दरम्यान या नियोजित ठिकाणी काही विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी वेशभूषा बदलून के.चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या नियोजनासाठी आलेल्या परिसरातील
कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्या जेवणावळी मांसाहारी जेवण असल्याचा खोटा प्रचार करून प्रसार माध्यमांना घेऊन चुकीच्या ठिकाणांचे विडिओ प्रसारित केले आहेत.सत्य परिस्थिती आणि वस्तुस्थिती बघता शाकाहारी जेवणाचे प्रबंधन करण्यात आले होते.
[ दौऱ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो? ]
तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव उद्या विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे. पण या दौऱ्याला काही विरोधी पार्ट्यांमधील राजकीय लोक गालबोट लावण्याचा कट व षडयंत्र रचत आहेत आणि दौऱ्या दरम्यान
मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो . दरम्यान या दौऱ्याला महाराष्ट्र सरकारने जास्तीत जास्त सुरक्षा द्यायला हवी जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.