Saturday, September 23, 2023

आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय;हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून करणार वृक्षारोपण

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांच्या बैठकीत आषाढी एकादशीनिमित्त कुर्बानी न देण्याचा निर्णय झाला आहे.

संत ज्ञानेश्वर माउली व नागेबाबांची पुण्यभूमी असलेल्या भेंडा बुद्रुक गावात मुस्लिम बांधवांच्यावतीने बकरी ईदच्या दिवशी हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशीला उपवास असल्याकारणाने यंदाच्या बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांकडून कुर्बानी न देण्याचा व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आषाढी एकादशी व बकरी ईदच्या दिवशी भेंडा गावामध्ये वृक्षारोपण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.
या निर्णयातून हिंदू- मुस्लिम भाई-भाई असल्याचा संदेश देण्यात आला.

या बैठकीस भेंडा मशिदीचे मौलाना आझिम शेख, डॉ.लहानु मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य कादर सय्यद, देवेंद्र काळे, दिलीप गोर्डे, किशोर मिसाळ, संभाजी मिसाळ, राजेंद्र चिंधे, ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे, यशिनभाई शेख, अफजल पटेल, संमद शेख, अहमद शेख, आयुब शेख, मुनीर शेख, हमीद शेख, बाबूभाई पठाण, अकबरभाई पठाण,वजीर शेख, समीर पठाण, मेताप सय्यद, नोहिद पटेल आदि उपस्थित होते.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!