माय महाराष्ट्र न्यूज:तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतले. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी
देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तर मंत्र्यांसह, आमदार, खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावे लागले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर यांनी व्हीआयपी दर्शन घेतले तर त्यांच्या
सहकाऱ्यांनी कळसाचे दर्शन घेतले. तसेच केसीआर यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनाही व्हीआयपी दर्शनाची परवानगी देण्यात आली होती. पण खासदार आमदारांनी नामदेव पायरीचे दर्शन घेतले.
केसीआर यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. मंदिर परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
के. चंद्रशेखर राव हे तब्बल ६०० गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.दरम्यान, विठ्ठलाचे दर्शन घेऊन केसीआर यांचा ताफा सरकोलीच्या दिशेने रवाना झाला आहे. त्याठिकाणी केसीआर शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार असून
राष्ट्रवादीचे माजी नेते भागीरथ भालके यांचा बीआरएस मध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. भागीरथ भालके यांच्याकडून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.