Saturday, September 23, 2023

केसीआर यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.आम्हाला महाराष्ट्रात येऊन केवळ चार महिने झाले आणि सर्व

पक्ष आमच्यावर टीका करत सुटले आहेत. खरे पाहता सगळेच पक्ष आम्हाला घाबरलेले आहेत. म्हणून चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. मात्र आमचा नारा आहे की भारतातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करायची आहे. आज

भगीरथ भालके यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. पण इतर पक्षांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हे असे का होत आहे? असा सवाल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यांनी सभेतून केला आहे.राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके

यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी आज बीआरएसमध्ये प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना केसीआर यांनी राज्यातील सर्वच

पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला.मी आज बघतोय सगळ्याच पक्षाचे नेते आमच्यावर टीका करत आहेत. कुणाची बी तर कुणी सी टीम असल्याचे सांगत सुटले आहेत. या टीम कुठून येतात? आम्ही शेतकरी, मागास वर्गाची टीम आहोत. बीआरएस

हा एकमेव पक्ष आहे ज्यानं घोषणा केली अब की बार, किसान की सरकार. आता या लोकांना भीती वाटत आहे. शेतकरी बीआरएसशी जोडले जातायत म्हणून हे सगळे सांगत आहेत. बीआरएस ही फक्त तेलंगणा किंवा महाराष्ट्रापर्यंत

मर्यादित पार्टी नाही, अशा शब्दांत केसीआर यांनी राज्यातील सर्वपक्षीयांना इशाराही दिला.मी भगीरथ भालके यांना आश्वासन देतो की, मी त्यांना पूर्ण पाठिंबा देईल. आम्ही पूर्णपणे त्यांच्यासोबत आहोत. भगीरथ भालके आमदार झाले तर मंत्री होतील. ते निवडून

विधानसभेत गेल्यावर पंढरपूरचा विकास होईल. भगीरथ युवा आहेत. त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असे केसीआर म्हणाले.भारतात पाणी, वीज मुबलक आहे. भारतातील वीज नीती बदलली पाहिजे. पुढील १५० वर्षे पुरेल एवढा कोळसा

भारतात आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियातून कोळसा आयात केला जातो आहे. मात्र असं असताना खासगीकरण केले जात आहे.महाराष्ट्रात रोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या होत आहेत हे ऐकून वाईट वाटते. आम्ही तेलंगणात शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज आहे.

पेरणीसाठी एकरी १० हजार रुपये देतो. आम्ही राज्यातील सर्व धान्य सरकार खरेदी करते. ऊसाच्या दरासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागतो. सरकारमध्ये एवढा दम नाही का की,ते ऊसाच्या दरावर कायमचा तोडगा काढू शकत नाहीत, असे केसीआर म्हणाले.

भगीरथ भालके म्हणाले की, तेलगंणामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनास अतिशय चांगल्या आहेत. तेलंगणा सरकार शेतकरी वर्गासाठी चांगले काम करत आहे. 2014 ला हे राज्य निर्माण झाले. आणि अवघ्या 9 वर्षांत त्यांनी राज्याचा विकास केला आहे.

महाराष्ट्रात कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना काहीच दिले नाही.बीआरएस ही शेतकऱ्यांच टीम आहे, कोणत्याही पक्षाची टीम नाही, असा टोला लगावला आहे. केसीआर यांनी आम्ही महाराष्ट्रात आल्याने इतर पक्षात भीतीचे वातावरण का? असा सवाल उपस्थित केला आहे.

सभेच्या आधी केसीआर यांनी दिवंगत आमदार भारत भालके यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. केसीआर यांच्या दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यात मंगळवारी सकाळी त्यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर सरकोली येथील शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!