नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे या दापत्यांना श्रीविठ्ठल महापुजेचा बहुमान मिळाला आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात आज गुरुवार दिनांक २९ जून रोजी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्रीविठ्ठलाची मनाची
शासकीय महापूजा झाली.
त्यांच्या समवेत नेवासा तालुक्यातील वाकडी येथील वारकरी दांपत्याला मानाचे स्थान मिळाल्यामुळे नेवासा तालुक्यातील वारकरी संप्रादयातून जल्लोष व्यक्त होत आहे.
काळे दाम्पत्य हे दांपत्य गेल्या ३५ वर्षांपासून श्रीक्षेत्र देवगड येथील भास्करगिरी महाराज यांच्या पायी दिंडीत सहभागी होत आहेत.