नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द गावचे सुपुत्र व धुळ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाबराव राजाराम खरात यांचा महाराष्ट्र राज्य नागरी सेवा केडर मधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) केडरमध्ये समाविष्ट झाला आहे.
राष्ट्रपतींनी महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील काही अधिकारयांची भारतीय प्रशासकीय सेवेत नियुक्त केलेल्या रिक्त पदांवर नियुक्ती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रशासन सेवेत असलेल्या अंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) केडर मध्ये समावेश झाला आहे.त्यात भेंडा खुर्द गावचे सुपुत्र व धुळ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गुलाबराव राजाराम खरात यांचा ही समावेश आहे.
श्री.खरात हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फ़त १९९६ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून शासन सेवेत रुजू झाले होते.त्यानंतर २०११ मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांना बढ़ती मिळाली होती. गेल्या २५ वर्षांपासून ते महसूल विभागात कार्यरत आहेत. अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा पुनर्वसन
अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. पदोन्नतीनंतर त्यांनी सुरवातीला नंदुरबार, नंतर जळगावला अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. काही काळ ते पुणे येथे शेती महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते.अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, जळगाव आणि धुळे आदी ठिकाणी जिल्हा जातपडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहण्याची संधी त्यांना मिळाली होती.
आता आयएएस केडर मध्ये समावेश झाल्याने जिल्हाधिकारी, महापलिकांचे आयुक्त,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व समक्ष दर्जाचे पदावर काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.