Thursday, October 5, 2023

….हे आहे बुलेटचं गाव

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

सांगली

आपल्याकडं बुलेट असावी, बुलेटस्वार होऊन सर्वांवर छाप पाडावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते. तरुणांप्रमाणेच तरुणींमध्येही बुलेटची क्रेझ आता चांगलीच वाढलीय.

सांगली जिल्ह्यातील बेडग गावाची ‘बुलेटचं गाव’ अशी ओळख आहे. साधारण 27 हजार लोकसंख्येचं हे गाव आहे.गावात पूर्वी एक मोटारसायकलही नव्हती. म्हैसाळ योजनेचं पाणी गावात आलं आणि गावाचं चित्र बदललं.

बेडगमधील गावकरी प्रामुख्यानं ऊस आणि द्राक्ष शेती करतात. जोडीला कुक्कूटपालन हा जोडधंदा देखील आहे. गावातील शेती बहरली आणि गावकऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढली.

आज ज्येष्ठ नागरिक बनलेल्या पिढीतील मंडळींनी बुलेट खरेदी केली. एका घरातील बुलेट पाहून त्यापेक्षा आधुनिक मॉडेलची बुलेट आपल्याकडं असावी, असा प्रयत्न इतरजण करू लागले

‘आधीच्या पिढीची बुलेटची आवड ही तरूणांनी देखील जपलीय. आमच्या गावातील तरूणांकडंही आधुनिक बुलेट आहेत. त्याचबरोबर आम्ही जुन्या बुलेटही जपून ठेवल्यात, असे गावातील तरुण सांगतात.

कुणीही नवी बुलेट आणली की त्यापेक्षा कडक फायरिंगची बुलेट माझ्याकडं कशी असेल, असं गावकऱ्यांना वाटतं, त्यामुळे इथून पुढेही गावात बुलेटच सर्वात जास्त दिसतील,’ अशी माहिती येथील गावकरी मल्लिकार्जून कांगुने यांनी दिली.

बेडगमधील तरुणींमध्येही बुलेटची आवड आहे. ‘आम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर पडताना, तसंच दुसऱ्या गावाला शिकायला जाताना बुलेटचा वापर करतो, अशी माहिती येथील शिक्षिका प्रतीक्षा चौगुले यांनी दिली.

तर आमचं 30 जणांचं एकत्र कुटुंब आहे. आमच्या घरात 5 बुलेट आहेत, असं येथील अन्य एक गावकरी अमरसिंह पाटील यांनी दिली. आमच्या गावातील प्रत्येक घरात एक-दोन बुलेट आहेत, असं त्यांनी सांगितलं.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!