बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला भीषण आग लागल्याने २५ जण ठार झाल्याची भीषण घटना घडली आहे.
यात ८ जण जखमी झाले असून जखमींवर जवळच्या रुग्णलायात उपचार सुरू आहेत. सदर घटना दि.१ जुलै रोजी पहाटे एक वाजेचे सुमारास घडल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळाकडे भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृताच्या वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.