माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे: सत्तापिपासू राजकारण्यांना आणि सत्तेसाठी स्वार्थी अशा लोकांना आता महाराष्ट्राच्या राजकारणातून भुईसपाट करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया भारत राष्ट्र समितीचे सोशल मीडियाचे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांनी केली आहे.
अजित पवार हे शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या महाराष्ट्रातल्या आजच्या गंभीर राजकीय परिस्थितीवर भारत राष्ट्र समितीचे सोशल मीडियाचे राष्ट्रीय प्रभारी जयंत देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशमुख म्हणाले की महाराष्ट्रातील सध्याची राजकीय अवस्था ही अतिशय दुर्भाग्य पूर्ण आहे आणि महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू आहे. याला एकच सर्वोत्तम पर्याय आणि तो म्हणजे भारत राष्ट्र समिती पक्ष. भारत राष्ट्र समिती ह्या पक्षांने तेलंगणा मॉडेल स्थापित करून
आठ ते नऊ वर्षांत विविध प्रकारच्या सुविधा तेलंगणातील सर्व प्रकारच्या लोकांसाठी प्रदान केले आहे.बी आर एस पक्ष आता महाराष्ट्रात आपली उभारणी करत आहे आणि बी आर एस पक्षाला महाराष्ट्रात जे जनतेचे समर्थन मिळाले आहे ते कौतुकास्पद आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातील ही राजकारणी मंडळी अतिशय सत्तापिपासू आणि सत्तेसाठी स्वार्थी आहे. सर्विकडे घोडेबाजार सुरू आहे आणि हे लोकांचा विचार करत नाही.
माझं सर्व जनतेला आव्हान आहे की अश्या कर्तव्य शून्य राजकारण्यांना महाराष्ट्रतील राजकारणातून भुईसपाट करणं गरजेचं आहे. हे जर भुईसपाट झाले नाही तर हे महाराष्ट्रातील जनतेला विकून खातील. जो घोड बाजार यांनी लावलेला आहे तो अतिशय गलिच्छ आणि निंदनीय आहे.
सर्व जनतेला एकच निर्धार करायचा आहे की आत्ता शेतकऱ्यांचे सरकार आणायचे आहे.आता देशात व महाराष्ट्रात तेलंगणा मॉडेल आणायचे आहे असे जयंत देशमुख यांनी सांगितले.