Saturday, September 23, 2023

नगर जिल्ह्यात १६४ नवीन रेशन दुकाने होणार सुरु

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: श्रीरामपूर शहरासह नगर जिल्ह्यातील १६४ नवीन स्वस्त धान्य दुकानांचे जाहीरनामे काढण्यात आले आहेत. दुकान घेणाऱ्यांनी ३१ जुलैपर्यत संबधीत तहसील कार्यालयातील

पुरवठा शाखेत अर्ज करावा,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे.  नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यात नवीन स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्यात येणार आहे. ग्रामीण

भागात १४७ तसेच नगर शहरात १७ नवीन स्वस्त धान्य दुकान सुरु करण्यात येणार आहे.श्रीरामपूर तालुक्यातील वांगी, रामपूर तसेच कडीत ब्रुद्रुक या गावाकरिता नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात येणार आहे. तसेच श्रीरामपूर शहरात रद्द झालेले एस के गुप्ता, एस. एस. डोळस,

सर्व्हंट को. ऑपरेटिव्ह सोसायटी, प्रगत प्राथमिक, अहमदनगर जिल्हा सेवक युनियन, मातापूर बिग बागायतदार सोसायटी असे सहा व ग्रामीण भागातील तीन असे एकूण ९ नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर करण्यात येणार आहे. नवीन स्वस्त धान्य दुकान घेऊ इच्छिणाऱ्या

महिला व पुरुष बचत गट, विविध संस्था, व्यक्ती यांनी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या बाबतची सविस्तर माहिती नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!