Thursday, October 5, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी साईदरबारी; प्रशासनाची जय्यत तयारी

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू शुक्रवारी (ता. ७) शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययाेजनासाठी जिल्हा प्रशासन, पाेलीस प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

साईदरबारी हजेरी लावणाऱ्या त्या सहाव्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती मुर्मू या शुक्रवारी विशेष विमानाने साईबाबा आंतरराष्ट्रीय विमान तळावर दाखल हाेणार आहे. राष्ट्रपती तीन तास शिर्डीत राहणार आहे.

साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावून त्या साई समाधीवर पाद्यपूजा करणार आहे. द्वारकामाई, साईबाबा वस्तुसंग्रहालयालाही भेटी देणार आहे. त्यानंतर साई संस्थांनच्या प्रसादालयात भाेजन करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पाेलीस अधीक्षक राकेश ओला, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर हे राष्ट्रपतींच्या दाैऱ्यासाठी नियाेजनात व्यस्त आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लाेखंडे, खासदार डाॅ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित राहणार आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्ताने शहरामधील मुख्य रस्त्यांची डागडुजी, दुभाजकांची रंगरंगोटी आदी ठिकाणी विशेष कामे सुरू आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!