माय महाराष्ट्र न्यूज:सरकारने ८० फिरत्या पशुवैद्यकीय पथकांची महत्त्वाकांक्षी सेवा नुकतीच कार्यान्वित केली आहे. यासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून एका फाेन काॅलवर
पशुपालकांच्या दारापर्यंत थेट पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यभरात दिल्या जाणाऱ्या ८० फिरत्या पशुवैद्यकीय पथकांपैकी ५ पथकांचे
प्रातिनिधिक स्वरुपात मुंबईतील विधानभवनाच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार प्रवीण दरेकर आदी उपस्थित हाेते. पशुवैद्यकीय सेवा थेट पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो.
राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी जीपीएस प्रणालीयुक्त फिरते पशुवैद्यकीय पथक कार्यान्वित करण्यात आले. पशू आरोग्याच्या बाबतीत आत्ताची ८० आणि त्यासोबतच टप्प्याटप्प्याने येणारी एकूण ३२९ फिरती पशुवैद्यकीय पथके महत्वाची भूमिका बजावणार आहेत