नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील तुषार कृष्णा नवले याची पोलिस उपनिरीक्षक पदी (Psi) निवड झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेव आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ मुख्य परीक्षा २०२० अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तुषार नवले यांची ही निवड झाली आहे.
तुषारचे शालेय शिक्षण भेंडा खुर्द शाळेत,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण भेंडा येथील जिजामाता विद्यालय तर बारामती येथे इलेक्ट्रिक इंजिनियरिंग पदवी पर्यंतचे शिक्षण झालेले आहे.गेल्या काही वर्षा पासून तो पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.त्यात त्याला यश मिळाले आहे.
तुषार हा जिल्हा सहकारी बैंक भेंडा शाखेचे रोखपाल कॄष्णा नवले यांचा मुलगा आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.