Saturday, September 23, 2023

कांद्याच्या भावात झाला बदल ?शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार इतरांनी रडू नये

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कांदा हा दररोजच्या जेवणात वापरला जातो. मात्र हाच कांदा शेतकऱ्याच्या डोळ्याला अनेक वेळा पाणी आणतो असे सरर्सपणे बोललं जातं. कांदा हे उत्पन्न कमी

कालावधीत तयार होणारे असल्यामुळे अनेक शेतकरी कांद्याच्या उत्पन्नाला पसंती देतात, त्यात कांद्याला थोडेफार कमी पाणी असले तरी कांद्याचे उत्पन्न घेता येते, त्यामुळे नगरसह इतर जिल्ह्यात

कांद्याचे उत्पन्न चांगले काढले जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून हाच कांदा शेतकऱ्यांना रडवताना दिसत होता.कांद्याचे दर स्थिर असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तर खर्चाचे देखील पैसे निघाले नाहीत, त्यातच वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न

कांदा-बटाटा बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर स्थिर होते. मात्र, शुक्रवार पासून घाऊक बाजारात कांदा वधारला आहे. कांद्याच्या दरामध्ये होणारी वाढ शेतकऱ्यांना समाधान देणार अस बोललं जातं आहे. कांद्याचे दर स्थिर, अवकाळी

पाऊस आणि सद्या होणारा सततचा पाऊस याचा परिणाम कांद्यावर झालेला दिसत आहे, त्यामुळे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.यंदा अवकाळी पावसामुळे साठवणुकीचा कांदादेखील भिजला असल्यामुळे मे महिन्यातच

ठेवणीतला कांदा खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. अशातच एपीएमसी मार्केटमध्ये फक्त ८७ गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात काद्यांचे दर प्रतिकिलोला ४ ते ६ रुपयांनी वाढले असून १२-२० रुपयांनी विक्री होत आहे.

अनेक शेतकरी हे उन्हाळी कांदा साठवून ठेवतात, कारण उन्हाळी कांद्याना चांगला भाव मिळतो अशी आशा प्रत्येक शेतकऱ्याला असते मात्र अनेक वेळा शेतकऱ्याच्या पदरी निराशाच पडते. मात्र, ह्या वेळी अवकाळी पाऊस आणि सततच्या होणाऱ्या

पावसाचा फटका कांद्याला बसला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची कमी होणारी आवक पाहता कांद्याचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अनेक चाळी मध्ये ठेवलेला कांदा हा पावसामुळे

खराब होत असताना कांद्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!