Thursday, October 5, 2023

नांदगाव मतदारसंघात विधानसभेसाठी नानासाहेब बच्छाव यांची जोरदार तयारी सुरू ?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष सक्रिय होत असतानाच भारत राष्ट्र समिती या नव्या पक्षाने गावागावांत प्रचार सुरू केला आहे. सक्रिय कार्यकर्ते टॅबच्या

माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबवित आहे. शिवाय शेतकरी व सामान्य व्यावसायिकांच्या हिताच्या पक्षाच्या योजना पुस्तिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचवत आहेत.तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्र प्रवेश केला आहे. मराठवाड्यापासून सुरवात झाल्यावर आता उत्तर महाराष्ट्रातही पाऊल टाकली आहेत. नाशिकसारख्या मोठ्या शहरात ठिकठिकाणी उभारल्या केसीआर यांच्या फोटोसह ‘अबकी बार किसान सरकार’ ही टॅगलाइन

असलेले प्रचाराचे होर्डिंग्ज झळकत आहेत.दरम्यान नाशिक जिल्ह्यातही भारत राष्ट्र समिती पक्षाने मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे. प्रत्येक मतदारसंघात समन्वयक तळमळीने काम करत आहे आणि याचाच एक भाग म्हणून लोकसभा विधानसभेची

ही तयारी पक्ष करत आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघात बी आर एस पक्षाने चांगली पकड बसवली आहे .उत्तर महाराष्ट्राचे भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष नानासाहेब बच्छाव हे नाशिक विभागातील मतदार संघात लक्ष घालत आहे. पक्षाची ध्येय धोरण पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहे.

नानासाहेब बच्छाव यांनी नांदगाव मतदारसंघात चांगलेच लक्ष घातले आहे .भारत राष्ट्र समितीकडून नाना बच्छाव हे संभाव्य उमेदवार नांदगाव मतदारसंघात असू शकतात. प्रत्येक गावात वाड्यावर पक्षाचे विकासाचे पुस्तके इतर साहित्य असेल हे प्रत्येक घराघरात पोहोचले आहे.

त्यामुळे भारत राष्ट्र समितीचकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मतदार संघातील ही लोके त्यास त्यात प्रतिष्ठित लोकांना कंटाळून गेले आहे . जनता मतदार संघात त्यामुळे आता नवीन व्यक्ती शोधत आहे. नानासाहेब बच्छाव यांनी भारत राष्ट्र समितीकडून उमेदवारी केली

तर ते निश्चितच चांगल्या मतांनी निवडून येऊ शकतात असे सर्वसामान्य व्यक्तीमध्ये चर्चा आहे.मतदारसंघातील समन्वयक निलेश चव्हाण, परशराम शिंदे, चंद्रकांत बच्छाव, आप्पासाहेब बच्छाव, पंजाबराव बच्छाव, अरूण निकम,निलेश आहेर यांनी जवळ जवळ सगळा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

मतदार संघाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यावर मतदारसंघातील व्यक्ती नाराज आहे असेही बोलले जात आहे. नवीन तरुण शेतकरी कुटुंबातील चेहरा शेतकऱ्यांविषयी काम करण्याची तळमळ म्हणून नानासाहेब बच्छाव यांच्याकडे शेतकरी बघत आहे.

बच्छाव यांनी निवडणूक जर लढवली तर सर्वसामान्य व्यक्ती हा दिवस-रात्र मेहनत करून त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मेहनत घेणार आहे असे मतदारसंघात बोले जात आहे.

[ नाना बच्छाव उत्तर महाराष्ट्रात चांगली पकड

नासिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यातही भारत राष्ट्र समिती प्रत्येक तालुक्यात व गावात पोहोचवण्यासाठी नानासाहेब बच्छाव हे लक्ष घालत आहे प्रत्येक ठिकाणी बैठका असेल तसेच संपर्क ठेवून पाचही जिल्ह्यात ते पक्ष कसा वाढेल या दृष्टीने काम करत आहे. बच्छाव यांची उत्तर महाराष्ट्रात चांगली पकड बी आर एस पक्षाच्या माध्यमातून तयार झाले आहे ]

[ नाना बच्छाव यांच्या सारख्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला जर पक्षाने उमेदवारी दिली तर निश्चितपणे पक्षाला फायदा होईल.2007 सालापासून बच्छाव हे शेतकरी चळवळीत काम करत आहे. आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करणे, शेतकरी कर्ज प्रकरण, सावकारी विषयावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे.त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन धनदांडग्या सत्ताधारी व्यक्तिला एक चांगला पर्याय दिला पाहिजे.

प्रकाश चव्हाण
सोशल मीडिया समन्वयक नाशिक]

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!