Thursday, October 5, 2023

धुळे व जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा बीआरएस मध्ये प्रवेश

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये धुळे व जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी तेलंगणा राज्याचे अर्थमंत्री हरिष राव व भारत राष्ट्र समिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत बी आर एस पक्षांमध्ये प्रवेश केला आहे.

नांदेड पासून सुरु झालेला प्रवास हा संपूर्ण महाराष्ट्रात भारत राष्ट्र पक्षाचा होत आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी जो तेलंगणामध्ये विकास केला आहे तशाच पद्धतीचा विकास महाराष्ट्रात करण्याचा त्यांचा मानस आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाचे सदस्य नोंदणी सुरू आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.तेलंगणा राज्यात जो विकास झाला आहे तो बघून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बदल घडवावा या अनुषंगाने बी आर एस पक्षांमध्ये अनेक नेते कार्यकर्ते प्रवेश करत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी बी आर एस पक्षांमध्ये गुरुवारी प्रवेश केला आहे.यामध्ये जिल्हा परिषद सदस्य ओंकार आबा जाधव, माजी सभापती विठ्ठल नागराडे,माजी सभापती विठ्ठल नगराळे, नारायण पवार, विजय तावरे , गजानन बाविस्कर,अविनाश पाटील, विठ्ठल पाटील यांनी प्रवेश केला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!