Thursday, October 5, 2023

अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा…

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आयएमडीने मुंबई, ठाणे, सिंधूदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वासिम आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला आहे.

त्याचवेळी सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये ऑरेंज् अलर्ट दिला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाट मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.देशभरात मान्सून दाखल झाला आहे.

हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईला यलो अलर्ट दिले तर पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. त्याचवेळी केरळमध्ये १ ते ६ जून दरम्यान १०६ टक्के पाऊस झाल्याचे म्हटले आहे.

केरळमध्ये 129 मिमी पावसाऐवजी 266 मिमी पाऊस या आठवड्यात झाला आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार जलधारा कोसळत आहेत. गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे.

नाशिकमध्ये पुढचे 2 दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पात 26 टक्के पाणीसाठा आहे. गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत 5 टक्के अधिक साठा आहे. जुलै महिन्यामध्ये

सरासरी इतका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पाणी कपातीचा निर्णय तूर्त घेण्यात आलेला नाही. गंगापूर धरणातही ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

आता पावसाने चांगला जोर धरल्यास पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!