माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार हे नाशिकमध्ये पोहोचले. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी सभा घेतली. यावेळी जोरदार भाषण करून कार्यकर्त्यांची मनं जिंकली.
काही जण म्हणाले, तुमचं वय झालं, तुम्ही निवृत्त व्हा, वय झालं हे खरं आहे, 82 झालं आहे हे खरं आहे. पण गडी काय आहे, हे पाहिलाय कुठे? अजून तर पत्ताच नाही.जास्त काही सांगायची गरज नाही.
उगाच वयाच्या भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, पुन्हा असा विचार करू नका. धोरणात्मक टीका करा, कार्यक्रमावर टीका करा, पण वय,व्यक्तिगत भावना आम्हाला कुणी शिकवलेली नाही. यशवंत चव्हाणांच्या विचारांचे लोक आहोत आम्ही.
व्यक्तिगत हल्ले कधी झाले नाही. आमची तक्रार नाही कधी, ज्या जनतेनं निवडून दिलं, ज्या जनतेच्या विश्वासाला तडा दिला ती गोष्ट सहन करणार नाही. आज ना उद्या तुम्हाला याची किंमत चुकवावी लागणार आहे. या ठिकाणी खात्रीने सांगतो, असं म्हणत पवारांनी अजितदादांना चांगलंच खडसावलं.
काही जण म्हणाले, तुमचं वय झालं, तुम्ही निवृत्त व्हा, वय झालं हे खरं आहे, 82 झालं आहे हे खरं आहे. पण गडी काय आहे, हे पाहिलाय कुठे? अजून तर पत्ताच नाही.जास्त काही सांगायची गरज नाही. उगाच वयाच्या भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख
कराल तर महागात पडेल, पुन्हा असा विचार करू नका’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कडक इशारा दिला आहे.