माय महाराष्ट्र न्यूज:एक रुपयात पीक विमा योजना ही राज्य शासनाने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. शेतकऱ्यांना अशा योजनेतून
लाभ देणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव राज्य आहे, असे प्रतिपादन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामाकरीता सुरू केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्यासाठी तयार
करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी हे रथ जिल्ह्यामध्ये रवाना करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी आधिकारी सुधाकर बोराळे,
उपविभागीय कृषी आधिकारी विलास गायकवाड, मच्छिंद्र थेटे, दीपक पठारे, सतीश कानवडे आदी उपस्थित होते.विखे पाटील म्हणाले की यापूर्वी पीक विमा योजनेचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला. शेतकऱ्यांची आर्थिक लुट आणि फसवणूक झाली.
या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना करिता एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली. त्याची अंमलबजावणी आता यंदाच्या खरीप हंगामापासून सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले.