माय महाराष्ट्र न्यूज: आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी असलेल्या नेवासा येथे गुरुवारी (ता.१३) मोठी यात्रा भरते. यावेळी माऊलींच्या
दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येणार असल्याचा आदेश प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी काढला आहे.
आषाढी शुद्ध एकादशीच्या निमीत्ताने पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेल्या सर्व दिंड्या व लाखोंच्या संख्येने गेलेले भाविक कामिका एकादशीच्या निमित्ताने पैस खांबाच्या दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी येथे अंदाजे ४ ते ५ लाख भाविक दर्शन घेत असतात.
यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या नेवासा फाटा, नेवासा बुद्रुक या रस्त्यावर पायी चालणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असेल. तसेच शेवगाव ते श्रीरामपूर मार्गावरील
वाहतूकीमुळे पायी चालणाऱ्या भाविकांना वाहनाचा अडथळा निर्माण होवू नये, म्हणून वाहतूक मार्गात बद्दल करण्यात आला आहे.श्री.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे.
श्रीरामपूर – शेवगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक आज (ता.१२) रात्री ११ वाजेपासून उद्या (ता.१३) रात्री ११ वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे.
असा राहणार वाहतूक मार्ग
छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांकरिता मार्ग – श्रीरामपूर – वैजापूर – छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर – टाकळीभान- नेवासा बुद्रुक- भालगाव–गोधेगाव – वाशिम टोका, शेवगावकडे जाणारे
वाहनांकरिता मार्ग श्रीरामपूर- टाकळीभान -नेवासा बुद्रुक -भालगाव-गोधेगाव -वाशिम टोका- सिध्देश्वर मंदिर -प्रवरासंगम, नेवासा फाटा- कुकाणा-शेवगाव असा वळविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.