माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असली तर अद्याप महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये हवा तसा पाऊस झालेला नाही. अशात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यानंतर
आता मात्र पावसाची उघडीप पाहयला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र, आता कोकणासह मुंबई, पुण्यातही पावसाचा जोर कमी होणार असून विदर्भ आणि मध्य
महाराष्ट्रात मात्र अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, राजगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर,
या जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज आहे. तर हवामान खात्याकडून नागपूरसह विदर्भ आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण
विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी सोमवारी व्यक्त केली.शनिवार, १५ जुलैपर्यंत आकाश
आंशिक ते अंशतः ढगाळ राहण्याची तसेच सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. १६ व १७ जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तसेच २२ जुलैपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे.
या १६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, हिंगोली, नांदेड,
नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या वेळी वादळी वारेही वाहतील