माय महाराष्ट्र न्यूज:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी डॉ.विजय कदम यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल अहमदनगर
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. विजय कदम हे अहमदनगर महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ही निवड पुढील पाच वर्षासाठी असून राष्ट्रीय शैक्षणिक
धोरण २०२० नुसार नवे अभ्यासक्रम निर्माण करण्याची जबाबदारी या अभ्यास मंडळावर असणार आहे. या निवडीबद्दल प्रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे
सदस्य प्राचार्य देविदास वायदांडे, इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. श्रद्धा कुंभोजकर, इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डाॕ. अशोक कानडे डॉ. उत्तम पठारे, डॉ. भूषण फडतरे, डॉ. कृष्णा पाटील आदींनी प्राध्यापक कदम यांचे अभिनंदन केले.