Saturday, September 23, 2023

सावधान:GBS या नव्या आजाराची दहशत; मुलांना पॅरेलेसिसचा धोका, ‘ही’ आहेत लक्षणं

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. असं असतानाच आता नवनवीन आजार समोर येत आहेत.

यातच चिमुकल्यांना धोका निर्माण झाला आहे. पेरूमध्ये गुइलेन-बेरी सिंड्रोमचा उद्रेक झाला असून हा एक ऑटो इम्यून सिंड्रोम आहे.Kidshealth.org नुसार, गुइलेन-बेरी सिंड्रोमध्ये शरीराची इम्यून सिस्टम मेंदू आणि स्पाइनल कॉर्डवर अटॅक करते.

यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये तात्पुरता अशक्तपणा किंवा अर्धांगवायू देखील होऊ शकतो. जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे आणि तो लहान मुलांनाही प्रभावित करू शकतो.सध्या पेरूमध्ये हा आजार झपाट्याने पसरत असून, हा आजार भारतातही येऊ शकतो,

अशी भीती सर्वांना वाटत आहे. जीबीएसचा छातीच्या स्नायूंवर परिणाम होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि काही काळ व्हेंटिलेटरवर राहावे लागू शकते. या आजारामुळे पॅरेलेसिस झालं तर घाबरण्याची गरज नाही, ते तात्पुरते आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिसिन सेंटरच्या मते, हा एक अल्पकालीन, जीवघेणा आजार आहे जो शरीराच्या नसांवर परिणाम करतो. यामुळे स्नायू कमकुवत होणे, वेदना होणे आणि चेहरा, छाती आणि पायाच्या स्नायूंना पॅरेलेसिस होऊ शकतं.

त्वरीत यावर योग्य ते उपचार न केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. या सिंड्रोमने त्रस्त असलेली काही मुलं ही बरी होतात. साधारण GBS सहसा लक्षणे दिसू लागल्यानंतर काही आठवड्यांत सुरू होते.

फिलाडेल्फियाच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या मते, प्रत्येक मुलामध्ये जीबीएसची लक्षणे भिन्न असू शकतात. यामध्ये हातापायांच्या बोटांमध्ये वेदना किंवा सुन्नपणा, कमकुवतपणा, चालण्यात अडचण, चिडचिड, श्वास घेण्यात अडचण आणि अशक्तपणा यांचा समावेश असू शकतो.

कोणतीही लक्षणे दिसल्यास बाळाला ताबडतोब डॉक्टरांना दाखवा.जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे असून तो कोणत्याही मुलांना होऊ शकतो. मुलामधील लक्षणं, वय आणि आरोग्य स्थिती यावरून उपचार केले जातात.

मुलाची स्थिती किती गंभीर आहे यावरही उपचार अवलंबून असतात. GBS बरा करण्यासाठी कोणताही उपचार नाही. त्याचे वेळेवर निदान हाच त्यावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. हा आजार स्वतःहूनच बरा होतो. पण तो जीवघेणा देखील असू शकतो.

संशोधकांना या सिंड्रोमचं नेमकं कारण माहीत नाही. हा एक ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये इम्यून सिस्टम ही आपल्याच नर्वस सिस्टमवर हल्ला करण्यास सुरवात करते. हे व्हायरल इन्फेक्शन, शस्त्रक्रिया, दुखापत, किंवा क्वचितच, लसीची रिएक्शन असेल तर होऊ शकतं.

काही लोक उपचारांनी लवकर बरं होऊ शकतात परंतु लवकर निदान होणं महत्त्वाचं आहे. मुलाला आयसीयूमध्ये ठेवावे लागण्याची शक्यता आहे. त्याच्या उपचारांमध्ये, श्वासोच्छवासाच्या समस्या टाळण्यासाठी आणि लक्षणे दूर करण्यावर काम केले जाते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!