Thursday, October 5, 2023

श्रीसंत नागेबाबा-सावता महाराज पुण्यतिथी निमित्त  कार्यक्रमाचे आयोजन

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा पुण्यतिथी, संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा व श्रीसंत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त नागेबाबा पतसंस्था परिवार व नागेबाबा देवस्थानचे वतीने आज दि.१६ जुलै रोजी भव्य पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागेबाबा परिवाराचे अध्यक्ष कडुभाऊ काळे यांनी दिली.

यानिमित्त रविवार दि.१६ रोजी सकाळी ९ ते ११ केशव महाराज उखळीकर यांचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटप.दुपारी १२ ते ३ संगीत भजन व ४ वाजता श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरीजी महाराज यांची सदिच्छा भेट.रात्री ७ वाजता नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन होणार आहे.

श्रीसंत नागेबाबा मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नागेबाबा परिवार, नागेबाबा मंदिराचे विश्वस्त व भेंडा ग्रामस्थानी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!