Saturday, September 23, 2023

ग्रंथदान हे सर्वश्रेष्ठ दान-प्राचार्य डॉ. बापूराव देसाई

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर

वस्त्रदान काही वर्षांनी फाटते, अन्नदान काही तासानंतर तर धनदान क्षणीक असते.मात्र ग्रंथदान हे अनेक पिढ्या-पिढ्या टिकणारे आहे ग्रंथ वाचन केल्याने पिढी सुसंस्कृत होते. त्यामुळे ग्रंथदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. असे प्रतिपादन नाशिकचे जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.बापूराव देसाई यांनी केले.

संस्कृती मंत्रालय, भारत सरकार व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता, उच्च तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक श्री. पी. एन. पणिक्कर यांच्या स्मृती व सन्मान प्रित्यर्थ वाचन दिनानिमीत्त ग्रंथदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ते पुढे म्हणाले की , जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने वाचन संस्कृती वाढीसाठी विविध उपक्रम राबवत असल्यामुळे हे कार्यालय वाचन संस्कृतीचा एक अंग बनले आहे तसेच जगामध्ये भारत हा सर्वात महान देश आहे. कारण प्रत्येक देशामध्ये एक तर ख्रिचन किंवा इस्लाम धर्माची माणसं मोठी आहेत. परंतु भारत हा देश असा एकमेव आहे की या ठिकाणी सर्व धर्माचे एक ना एक व्यक्ती सर्वोच्च पदावर असल्याने मेरा भारत महान खऱ्या अर्थाने सार्थक आहे. त्यांनी ग्रंथ दानाचे महत्त्व विशद केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर अहिरे सर उपस्थित होते. ग्रंथदान कार्यक्रम जानकीताई आपटे बालविकास संस्थेचे माणिकताई करंदीकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केला होता. यावेळी सर्व विद्यार्थी ,शिक्षक यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते ग्रंथदान करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ जाहेल पठाण जेष्ठ शिक्षक श्री अनिल सुद्रिक ,शर्मिला कुलकर्णी, श्री सुहेल शेख ,शरीफ बेग ,सुनिल मुळे,अनु साळवे, जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे, निरीक्षक रामदास शिंदे, तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे, संतोष वाडेकर, वसंत कर्डिले, आदींसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले. त्यावेळी त्यांनी वाचन संस्कृती प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने माणिकताई करंदीकर विद्यालयात विद्यार्थी शिक्षक यांना ग्रंथदान भेट उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. हे ग्रंथदान भेट पुस्तके सर्व विद्यार्थ्यांनी वाचन करून आपल्या शिक्षकांना त्याची माहिती द्यावी. तसेच शिक्षकांनी देखील आपल्याला दिलेले पुस्तकांच प्रत्येक दिवशी शाळेमध्ये अभिवाचन करावे. असे त्यांनी सांगितले. तसेच वाचन संस्कृती वाढीसाठी व ग्रंथालयामध्ये सभासद होण्यासाठीची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. सूत्रसंचालन सौ.शर्मिला कुलकर्णी मॅडम यांनी केले तर आभार प्रा. अनिल सुद्रिक यांनी मानले.यावेळी शिक्षक ,विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!