नेवासा/प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी तसेच ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरात कामिका वद्य एकादशी यात्रेच्या निमित्ताने लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व नेवासा-शेवगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी पैस खांबाचे दर्शन घेतले.
श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिर व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे आध्यात्मिक संबध स्वश्रुत आहे.ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना उभारणी करिता वै.बंशी महाराज तांबे व लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी भेंडा येथील जागेची निवड केली. इतकेच नव्हे तर कारखाना उभारणीसाठी आलेल्या मशनरिचा पहिला ट्रक नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरात नेऊन तेथे मशनिरीची पूजा केली.एवढेच नव्हे तर कारखान्याला नाव सुद्धा ज्ञानेश्वर माउलींचेच दिले.लोकनेते घुले पाटील यांच्या नतंर ही तोच वारसा घुले बंधु पुढे चालवत आहेत.
नरेंद्र घुले हे आमदार असताना त्यांनी ही ज्ञानेश्वर मंदिर व नेवासा शहराच्या विकासासाठी भरिव प्रयत्न केलेले आहेत.कामीका एकादशी निमित्त पैस खांबाचे दर्शन घेऊन उपस्थित भविकांना फराळ वाटप ही केले.त्यांचे समवेत कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, दादा गंडाळ,जनार्दन पटारे हे ही उपस्थित होते.