माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पुढचे 4-5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.
या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल.तर मराठवाडा आणि इतर काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.यासोबतच कोल्हापूर,
सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.दरम्यान, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.17 जुलैपर्यंत विदर्भातील सगळ्याच
जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी सुखावले आहेत. राज्यात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारल्याचं चित्र पाहायला
मिळत आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा संपत आला तरी राज्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही.त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान,
मुंबईसह उपनगरात पावसानं चांगली हजेरी लावली. त्याचबरोबर ठाणे, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार,
पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.सध्या राज्यात काही ठिकाणीच पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. मात्र, पावसानं चांगलीच दडी मारल्याचं
चित्र दिसत आहे. काही ठिकाणी मात्र, जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.