Wednesday, August 17, 2022

अन्नदाता शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन;विविध प्रश्नांकडे वेधले लक्ष

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

औरंगाबाद

अन्नदाता शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळाने अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांचे नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनातील मागण्यांवर मुंबईत गेल्यावर मुंबई येथे सविस्तर चर्चा करण्याचे आश्वसन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी विश्राम गृहात अन्नदाता शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

या भेटीत राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी तेलंगणा सरकारच्या धर्तीवर योजना राबवाव्यात , खरीप ,रब्बी आणि उन्हाळी पीक पेरणीसाठी तेलंगणा सरकार एकरी पाच हजाराची मदत करते ती करण्यात यावी . ओला दुष्काळ जाहीर करावा . विहीर बागायत शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफी देण्यात यावी. मागील दोन वर्षंपासून अतिवृष्टी मुले मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी कर्जाचे हप्ते भरू शकला नाही त्यामुळे तो.थकबाकी गेला . सरकारने रेगुलार शेतकऱ्यांना ५०,००० ची मदत केली तशी मदत सर्व शेतकऱ्यांना द्यावी . फायनान्स कंपनीच्या जाचामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्यावर कार्यवाही भावी. रोजगार हमी योजेंतर्गत होणारी सर्व कामे फसवी आसतात त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतावर होणारी फळबाग लागवड किंवा विहरीची कामे रोजगार हमी मधून काढून टाकावीत . शेतकऱ्यांना मदत देताना जात आणि जमीन मर्यादा काढून टाकावी ज्यांना फळबाग लागवड करायची आहे त्या सर्वांना योजनेचा फायदा द्यावा. वीज वितरण कपनी शेतकऱ्यांच्या 3 hp चे 5 hp , 5 hp चे 7.5 hp या पद्धतीने लूट करते ती लूट करते ती थांबवण्यात यावीत. देशी गो वंश सांभाळणे शक्य नाही त्यामुळे देशी गो वंश पालकास आर्थिक मदत करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या विषयावर मुंबई येथे सविस्तर चर्चा करण्याचे आश्वसन मुखमंत्र्यांनी दिले.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!