Thursday, August 11, 2022

औरंगाबाद नगर,बेलापूर-बीड, नाशिक-शिर्डी, राहुरी- शिंगणापूर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:औरंगाबाद-नगर या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली होती. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण अहवाल पूर्ण झालेले आहेत.

 

या अहवालांना संबंधीत रेल्वे अधिकाऱ्यांकडून मंजूरी मिळाली आहे. औरंगाबाद नगर प्रस्तावित रेल्वे मार्गाला मंजूरी देण्यापुर्वीच्या काही तांत्रीक बाबी अजुनही पुर्तता करण्याचे काम सध्या सुरू आहे.

 

औरंगाबाद नगर प्रस्तावित रेल्वे मार्गाला आगामी अर्थसंकल्पात निधी मिळण्याची शक्यता रेल्वे विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.रेल्वे विभागाकडून ६ जुलै २०२२ रोजी विविध

 

रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणाच्या सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर केला आहे. यात महाराष्ट्रातील एकूण ३५ रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात औरंगाबाद नगरसह

 

उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद, बेलापूर-बीड, नाशिक-शिर्डी व्हाया सिन्नर मार्गे, राहुरी- शनि शिंगणापूर, जालना- खामगाव, जालना जळगाव, औरंगाबाद बुलढाणा खामगाव, औरंगाबाद-भुसावळ-जळगाव यांसह अन्य

 

रेल्वे मार्गांचा; तसेच रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकासाबाबतच्या प्रस्तावाची माहिती देण्यात आली आहे.औरंगाबाद-नगर या रेल्वेमार्गाबाबत सध्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

 

यांनी प्रयत्न सुरू केले होते. या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी विशेष पथकाने औरंगाबादेत; तसेच अन्य भागांत जाऊन प्रवासी वाहतूकसह मालवाहतुकीबाबत माहिती घेतली होती. या रेल्वे मार्गाचे टीओआर म्हणजे

 

टर्नओव्हर रेशो याचाही अहवाल तयार करण्यात आला होता. या अहवालाही मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय या रेल्वे मार्गाच्या आरओआर रेल्वे प्रकल्प अहवालही सादर करण्यात आला आहे. या अहवालात

 

काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू आहे. या तांत्रिक बाबी पुर्ण झाल्यानंतर सदर रेल्वे मार्गाचा प्रस्ताव वित्त विभागाकडून मंजुरीनंतर अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येणार आहे.

 

आगामी अर्थसंकल्पात हा रेल्वे मार्गाला निधी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

 

 

ताज्या बातम्या

भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हर घर तिरंगा अभियान राबविणार-सरपंच प्रा.उषा मिसाळ

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत हद्दी मध्ये दि.१३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट दरम्यान भारत देश स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान राबवणार आहे...

जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या नेवासा ते औरंगाबाद मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

नेवासा/प्रतिनिधी श्री क्षेत्र नाणीज येथील जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने नेवासा फाटा येथे मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मंगळवार दि.९ ऑगस्ट रोजी विधिवत...

पत्रकारिता अभ्यासक्रमात भाऊसाहेब कासार प्रथम तर रमेश खरबस द्वितीय

  माय महाराष्ट्र न्यूज:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत शिक्षक भाऊसाहेब कासार हे प्रथम तर रमेश खरबस यांनी द्वितीय...

नागेबाबा मल्टीस्टेटच्या मयत सभासदाच्या वारसाला १० लाखाचा धनादेश प्रदान

राहुरी/प्रतिनिधी श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या मयत सभासदाच्या वारसांना नागेबाबा सुरक्षा कवच योजनेअंतर्गत आज राहुरी येथे माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे व शिवशाहीर विजय तनपुरे यांचे...

हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता- स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:--  हनुमंतराय ही बुद्धी आणि शक्तीची देवता असल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनात  हनुमंतरायांची मनोभावे सेवा केली पाहिजे असे प्रतिपादन श्री क्षेत्र...

यिन केंद्रीय कॅबिनेट सभापतीपदी दिव्या भोसले यांची वर्णी संपूर्ण राज्यातील युवकांमधून झाली निवड

मुंबई/प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या यिन 'कॉनक्लेव २०२२' कार्यक्रमात भरघोस मताधिक्क्याने जळगावच्या दिव्या भोसले यांची यिन केंद्रीय कॅबिनेट सभापती म्हणून निवड करण्यात आली.राज्यातील लाखो युवकांनी दिव्या भोसले...
error: Content is protected !!