नेवासा
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल अभंग यांनी केले.
नेवासा तालुक्यातील तरवडी येथे महाराष्ट्र लहुजी सेनेच्या वतीने सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भैरवनाथ भारस्कर व केंद्र प्रमुख नंदू भारस्कर यांच्या नेतृत्वाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची तालुकास्तरीय जयंती साजरी करण्यात आली. युवानेते अभंग यांचे हस्ते लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे हे होते.
यावेळी सुभाष चौधरी, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, राहुल जावळे, समीर पठाण, सोमनाथ कचरे, सिद्धार्थ कावरे, मनोज हुलजुते, तरवडीचे सरपंच जालिंदर तुपे, उपसरपंच दत्तात्रय भारस्कर, सेवा सोसायटीचे अध्यक्ष सचिन क्षीरसागर, जनार्दन क्षीरसागर, रामदास घुले, दिनेश तुपे, राजेंद्र गरड, अण्णा भारस्कर, शिवाजी, भारस्कर, उत्तमराव भारस्कर, सायमन भारस्कर, सुधीर भारस्कर, अमोल दरवडे, कारभारी दरवडे, मधुकर इंगळे, सुनील खरात, शंकर उमाप, गोविंद भारस्कर, बाबासाहेब भारस्कर, दास भारस्कर, जालिंदर भारस्कर, संजय भारस्कर, सतीश भारस्कर, बबलू कनगरे, अजय भारस्कर, सतीश उमाप, सुनील भारस्कर, रमेश भारस्कर, अशोक भारस्कर, दिनेश भारस्कर, सोनू इंगळे, सलीम सय्यद आदी उपस्थित होते. शरद तांबे यांनी
सूत्रसंचालन केले.