भेंडा(नेवासा)
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या सानिध्यात आलो,त्यांनी माझ्यावर निश्चिम प्रेम केले आणि त्यांच्या परीस स्पर्शाने माझ्या जीवनाचे सोने झाले असे भावपूर्ण उदगार लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी काढले.
तर अभंग साहेब हे तरुणांना ऊर्जा देणारे नेतृत्व आहे असे प्रतिपादन तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी केले.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना व उद्योग समूहाचे वतीने तज्ञ संचालक डॉ.क्षितिज घुले पाटील यांचे हस्ते वाढदिवसानिमित्त श्री.अभंग यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, अशोकराव मिसाळ,शिवाजीराव कोलते,संतोष पावसे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ.क्षितिज घुले म्हणाले,सर्वच क्षेत्रात अभंग साहेबांचे भरीव योगदान आहे.लोकनेते घुले पाटील साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.सर्वांना बरोबर घेऊन जाणारे हे नेतृत्व आहे.नेतृत्वाने स्वतःचे उदाहरण दुसऱ्या समोर ठेवले पाहिजे.नरेंद्र घुले पाटील व अभंग साहेब यांच्या नेतृत्वातून-कार्यपद्धतीतून इतरांना ऊर्जा मिळते.
संचालक अड.देसाई देशमुख, काशिनाथ नवले यांनी ही मनोगत व्यक्त केले.
घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,नामदेव निकम,किसन यादव, संभाजी माळवदे, महेंद्र पवार, राहुल पाटील,कारभारी गायके,रामनाथ गरड,भगवंता शेंडगे, बाळासाहेब डोहाळे,सुनिल देशमुख, बाळासाहेब आरगडे, शरद आरगडे, संदीप फुलारी,नारायण राऊत,वाकडीचे पोलीस पाटील श्री.काळे आदी यावेळी उपस्थित होते.
कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी आभार मानले.