Wednesday, August 17, 2022

श्रीसंत नागेबाबा यात्रा वर्गणी शुभारंभ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावचे जागृत देवस्थान श्रीसंत नागेबाबा यात्रेकरिता वर्गणीचा शुभारंभ अंकुश महाराज कादे यांचे हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.

दरवर्षी श्रावणी तिसऱ्या सोमवारी गावचे ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबाची यात्रा भरते.यावर्षी १५ ऑगस्ट रोजी यात्रा आहे.यात्रेनिमित्त गुरुवर्य मिराबाई महाराज मिरीकर यांचे मार्गदर्शनाखाली दि.९ ते १६ ऑगस्ट पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे.यासाठी वर्गणीचा शुभारंभ पहिल्या श्रावणी सोमवार दि.१ ऑगस्ट रोजी अंकुश महाराज कादे,देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव तागड,ज्ञानेश्वरचे कामगार संचालक सुखदेव फुलारी,पुजारी अशोक गव्हाणे यांचे हस्ते नागेबाबांच्या समाधीवर श्रीफळ अर्पण करून झाला.

यावेळी मंदिराचे विश्वस्त तुकाराम मिसाळ,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,ज्ञानेश्वरचे संचालक अशोकराव मिसाळ,देविदास गव्हाणे,तुलसीदास फुलारी,अशोक वायकर,नामदेव शिंदे,आबासाहेब काळे,डॉ.रामराव आढाव, नामदेव निकम,बाबासाहेब भागवत,भुजंगराव फुलारी,बबनराव तागड,बाळासाहेब गव्हाणे,संदीप फुलारी,नंदू गव्हाणे,अशोक गव्हाणे,दत्तात्रय गव्हाणे,गुलाबराव आढागळे,डॉ.संतोष फुलारी, डॉ.लहानू मिसाळ, अरुण गोर्डे, राजेंद्र चिंधे, कारभारी जगताप, भीमराज मिसाळ,चंद्रकांत फुलारी,किसन यादव,सुभाष महाशिकारे,बाळासाहेब वाघडकर, भाऊसाहेब तागड,ज्ञानदेव तागड आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!