Wednesday, August 17, 2022

गुडन्युज! सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:दोन दिवसांपूर्वी गुजरामधील गांधीनगरमध्ये सुरू केलेल्या बुलियन एक्सचेंजमुळे संपूर्ण देशात सोन्याचा

एकच दर निश्चित करण्यात मदत होईल. ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’, योजना लागू करणे त्यामुळे शक्य होणार आहे.सध्या तामिळनाडूपासून जम्मू-काश्मीरपर्यंत सोन्याचा भाव विभिन्न असतो.

मात्र, सोने ज्या बंदरावर आयात होऊन उतरविले जाते, तेथून ते देशातील वेगवेगळ्या राज्यांत पाठविले जाते. वाहतुकीचा खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यातील सोन्याचा भाव वेगळा होतो. ही परिस्थिती

बुलियन एक्स्चेंजमुळे बदलणार आहे.बुलियन एक्सचेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकतील. यात वाहतुकीचा खर्च वाचेल. असल्यामुळे सोन्याचा

दर कमी ठेवण्यातही मदत मिळेल. याबाबत ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, वाहतूक खर्चास फाटा मिळाल्यामुळे सोने स्वस्तात मिळेल.

भविष्यात सोन्याचा भाव वाढला नाही, तर स्वस्त दराचा फायदा ग्राहकांना मिळू शकेल. बुलियन एक्सचेंजमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या एका प्लॅटफॉर्मवर येतील.

त्याचा लाभ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांना फायदा होईल.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!