माय महाराष्ट्र न्यूज:बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेमागे अनेक काळे रहस्य दडलेले आहेत. मध्यंतरी ‘मी टू’ या मोहिमेच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी याला
वाचा फोडली. आता बॉलिवूडमधील बिनदास्त गर्ल आणि ‘मर्डर’ फेम अभिनेत्री मल्लिका शेरावत हिनेही एक गौप्यस्फोट केला आहे.मल्लिका शेरावत पडद्यावर जेवढी बोल्डपणे वावरते
तेवढीच रियल लाईफमध्येही बोल्ड बोलते. रोखठोक प्रश्नांची सडेतोड उत्तरे देण्यात तिचा हात कोणी धरू शकत नाही. नुकतेचे तिने बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचबाबत विधान केले आहे.
कास्टिंग काऊचमुळे आपली कारकिर्द प्रभावित झाल्याचे तिने मान्य केले. आघाडीच्या अनेक अभिनेत्यांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला, कारण मी त्यांच्यासोबत समझोता केला
नाही, असे मल्लिका शेरावत हिने म्हटले.‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. ती म्हणाली की, एकदम सोपे आहे. अभिनेते त्याच
अभिनेत्रीची निवड करतात जिला ते कंट्रोल करू शकतात आणि जी त्यांच्यासोबत समझोता करू शकते. मी तशी नाहीय, माझे व्यक्तीमत्व तसे नाहीय. मला स्वत:ला कोणाच्या इच्छा
भाग व्हायचे नव्हते. यावेळी समझोताचा नक्की अर्थ काय हे देखील मल्लिकाने उलगडून सांगितले.जर अभिनेत्याने रात्री 3 वाजता तुम्हाला फोन केला आणि ‘माझ्या घरी ये’ असे म्हटले तर
तुम्हाला जावे लागते, अन्यथा तुम्हाला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला जातो, असे मल्लिकाने सांगितले. मल्लिका शेरावत 2004 मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती.
परंतु गेल्या काही वर्षात ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. याबाबत बोलताना ती म्हणाली की, मी नेहमीच चांगल्या भूमिकेच्या शोधात असते.
मी देखील काही चुका केल्यात. काही भूमिका चांगल्या होत्या, तर काही खास नव्हत्या.