माय महाराष्ट्र न्यूज:राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला आता 34 रुपये दर द्यावाच लागणार आहे. जी दूध डेअरी गायीच्या दुधाला 34 रुपयांपेक्षा कमी दर देईल त्या दूध डेअरीवर
आता कारवाई होणार आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या दूधाचा दर निश्चिच करण्यासाठी दूध दर निश्चिती समितीची स्थापना केली होती. या समितीनं आपला अहवाल सादर केला आहे. या समितीच्या अहवालामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन करतात. मात्र अनेकदा दूधाला चांगला दर मिळत नसल्यानं त्यांना मोठा फटका बसतो. मात्र आता दरनिश्चिती करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.