भेंडा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन २०२२-२३ या गळीत हंगामासाठी बसविण्यात आलेल्या मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
गेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने २१९ दिवसात १६ लाख ६० हजार ५४० मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप केले आहे.येणाऱ्या सन २०२२-२३ च्या गळीत हंगामात ही १६.५ लाख मेट्रिक टनाहुन अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्याचे पूर्व तयारीचे दृष्टीने कारखाना मशनरीचे ओव्हरऑइलिंगची कामे जोमाने सुरू आहेत. तसेच ऊस तोडणी-वहातुक मजूर भरतीचे काम ही प्रगती पथावर आहे.त्याचाच एक भाग असलेल्या मिल रोलरचे देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने तो बसविण्याचे काम सुरू करण्याप्रसंगी रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे,विठ्ठलराव लंघे,काकासाहेब शिंदे, अशोकराव मिसाळ,शिवाजीराव कोलते,दादासाहेब गंडाळ, कामगार संचालक सुखदेव फुलारी, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे, जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के, के.एन.गायके, तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी,मुख्य अभियंता राहुल पाटील,उपमुख्य अभियंता मोहन दुधाळ, नंदकुमार चोथे, रमेश मोटे, राजेंद्र वाबळे, शेतकी अधिकारी सुरेश आहेर,बाळासाहेब डोहाळे, रामनाथ गरड,भगवंता शेंडगे,विष्णुपंत वाबळे,विलास लोखंडे,बाळासाहेब आरगडे, बाळकृष्ण पुरोहित,सतिष शिंदे,रमेश दुकळे,संभाजी माळवदे, रामभाऊ पाउलबुद्धे, स्टोअर किपर नामदेव मुळे, अभियंता रोहित मोटे,मिल फोअरमन राजेंद्र मनवेलीकर,आदिनाथ गरड यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.