Wednesday, August 17, 2022

जयश्रीताई तिकांडे महाराज यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील महिला कीर्तनकार हरिभक्त परायण समाज

प्रबोधनकार जयश्रीताई महाराज तिकांडे यांना देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव संघटनेच्यावतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी

महाराष्ट्र राज्यातून दोनच व्यक्तींची निवड झाली असून यामध्ये हरिभक्त परायण जयश्रीताई तिकांडे यांची निवड झाली आहे.या पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे शनिवार दि. 12 ऑगस्ट

2022 रोजी देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मिझोरामचे माजी राज्यपाल अमलोक रतन कोहली, केंद्रीय सूचना आणि प्रसारण

मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण राज्यमंत्री फगनसिंग कुलस्थे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जावेद जमादार, राष्ट्रीय सचिव डॉ. मनीष गवई, पुनीत प्रधान, उद्योगपती

अदित्य सिंघानिया यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे होणार आहे. जयश्रीताई तिकांडे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!