Wednesday, August 17, 2022

मोठी बातमी:उद्या होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?नगर जिल्ह्यातून हे नावं निश्चित ?…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार महिना उलटून गेल्यानंतरही रखडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा

झाल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता मंत्रिमंडळ विस्तार हा उद्याच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात

काही जुन्या तर काही नव्या नावांना संधी मिळणार आहे. उद्या, शुक्रवारी भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल.

त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागणार आहे.

भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन

राधाकृष्ण विखे पाटील

बबनराव लोणीकर

प्रवीण दरेकर

रविंद्र चव्हाण

नितेश राणे

शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळू शकते?

गुलाबराव पाटील

उदय सामंत

दादा भुसे

शंभूराज देसाई

अब्दुल सत्तार

दीपक केसरकर

संदीपान भुमरे

संजय शिरसाट

अपक्षांपैकी बच्चू कडू किंवा रवि राणा यांना संधी मिळू शकते. यात बच्चू कडू यांचं पारडं जड आहे.

विस्ताराबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!