Wednesday, August 17, 2022

मंकीपॉक्सची नवी भयंकर लक्षणं समोर : प्रायव्हेट पार्टवरही करतोय हल्ला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाचा कहर आता आता कुठे कमी होऊ लागलेला असतानाच मंकीपॉक्सने डोकं वर काढलं आहे. मंकीपॉक्स हा विषाणूजन्य

आजार आफ्रिका खंडात गेली अनेक वर्षं आढळतो; मात्र आता तो जगभरातल्या 75 देशांत आढळू लागला असून, भारतातही या आजाराचे काही रुग्ण आढळले आहेत. या आजारावर

संशोधन सुरू असून, अभ्यासातून त्याची वेगवेगळी लक्षणं लक्षात येऊ लागली आहेत. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनात अशीच काही नवी लक्षणं दिसून आली आहेत.

मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये अशी काही लक्षणं दिसत आहेत, की जी सर्वसाधारणपणे विषाणू संसर्गाशी निगडित असत नाहीत.पुरुषांच्या लिंगाला सूज येणं आणि मलाशयात

ही नवी लक्षणं मंकीपॉक्सचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. मे ते जुलै 2022 या कालावधी लंडनमधल्या संसर्गजन्य रोग संशोधन केंद्रात याबद्दलचं संशोधन करण्यात आलं होतं. तेव्हा ही निरीक्षणं नोंदवण्यात आली.

या संशोधनात 197 मंकीपॉक्सबाधितांची निरीक्षणं नोंदवण्यात आली. हे सर्व रुग्ण पुरुष होते आणि त्यांचं सरासरी वय 38 वर्षं होतं. त्यापैकी 196 पुरुष समलैंगिक किंवा

कोणत्याही प्रकारे अन्य पुरुषांशीच लैंगिक संबंध ठेवणारे होते. त्यापैकी 86 टक्के रुग्णांनी या संसर्गामुळे संपूर्ण शरीरावर प्रभाव पडल्याचं सांगितलं. 62 टक्के रुग्णांना ताप आला होता.

58 टक्के रुग्णांच्या लिम्फ नोड्समध्ये सूज आली होती. 32 टक्के रुग्णांच्या स्नायूंमध्ये वेदना होत होत्या.71 रुग्णांच्या मलाशयातही वेदना होत होत्या. 33 रुग्णांच्या घशात खवखव होत होती

तर 31 जणांच्या लिंगाला सूज आली होती. 27 रुग्णांच्या तोंडात जखमा झाल्या होत्या. 22 जणांना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर जखमा झाल्या होत्या. 9 जणांच्या टॉन्सिल्सना

सूज आली होती. टॉन्सिल्सना सूज येणं, तसंच एका ठिकाणी जखमा होणं ही पूर्वी मंकीपॉक्सची लक्षणं नव्हती, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!