Wednesday, August 17, 2022

प्रो-कबड्डीसाठी भेंड्याच्या शंकर गदाई साठी 30 लाखाची तर राहुल खाटीक व राहुल धनवडे साठी 10 लाखाची बोली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

प्रो-कबड्डीच्या नवव्या हंगामाचा लिलाव दि.५ ऑगस्ट पासून मुंबईत सुरू आहे. या लिलावात भेंड्याच्या शंकर गदाईची साठी 30 लाखाची तर राहुल खाटीक व राहुल धनवडे साठी 10 लाखाची बोली लागली.

मुंबईत हा लिलाव पार पडत असून अ, ब, क आणि ड अशी चार वर्गवारी करण्यात आल्या आहेत. अ कॅटेगरीमधील खेळाडूची बेस प्राइझ 30 लाख, ब मधील खेळाडूची 20 लाख, क मधील खेळाडूची 10 लाख आणि ड मधील खेळाडूची 6 लाख रुपये आहे. प्रत्येक संघाला कमीतकमी 2 आणि जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडू घेता येणार. या लिलावात पहिल्या दिवशी पवनकुमार सहरावत याला 2 कोटी 26 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लागली. प्रो कबड्डीच्या इतिहासात आजपर्यंत एवढी बोली कोणालाही लागलेली नाही. याआधी प्रदीप नरवाल याला 1 कोटी 65 लाख रुपयांची बोली लागली होती.

*क-कॅटेगरीसाठी (10 लाख बेस प्राइझ) लिलाव झालेले स्थानिक खेळाडू असे….*

आशिष सांगवाण 10 लाख (यु मुंबा संघ),सचिन नरवाल 10 लाख(बंगळुरू बुल्स),गुरदीप 10 लाख (यूपी योद्धा)
तनुषण लक्ष्मणमोहन 10 लाख (तमिळ थलायवाज),मोहम्मद आरिफ रब्बानी, 10 लाख (तमिळ थलायवाज) ,अक्रम शेख 32 लाख 10 हजार( गुजरात जायंट्स), *शंकर भीमराज गदाई 30 लाख 30 हजार (गुजरात जायंट्स)* ,
बालाजी डी 20 लाख 60 हजार (बंगाल वारीयर्स),विनोद कुमार – 10 लाख (बंगाल वारीयर्स), *राहुल खाटीक10 लाख (पाटणा पायरेट्स)* ,
अब्दुल इंसामम – 10 लाख (पाटणा पायरेट्स),के. हनुमंथु 10 लाख (तेलगू टायटन्स), परवीन सतपाल 10 लाख, (बंगाल वारीयर्स),सौरभ गुलीया 10 लाख (गुजरात जायंट्स),रिंकू नरवाल – 40 लाख (गुजरात जायंट्स), संदीप कंडोला 10 लाख ( गुजरात जायंट्स),
हरेंदर कुमार 20 लाख (यु मुंबा),
सुरेंदर नाडा 10 लाख (बंगाल वारीयर्स),अमित हुड्डा 10 लाख (दबंग दिल्ली),सुधाकर कदम 10 लाख, (बंगाल वारीयर्स),अनिल कुमार 10 लाख (दबंग दिल्ली),विनोद कुमार – 10 लाख (गुजरात जायंट्स),आदर्श टी. 10 लाख (तेलगू टायटन्स),बलदेव सिंग 21 लाख 50 हजार (गुजरात जायंट्स), रविंदर पहल 23 लाख, (तेलगू टायटन्स),शुभम शिंदे 20 लाख 30 हजार (बंगाल वारीयर्स),शिवम चौधरी 15 लाख 20 हजार (पाटणा पायरेट्स),रवी कुमार 64 लाख 10 हजार (दबंग दिल्ली).

लिलाव झालेले विदेशी खेळाडू असे…*

डॅनियल10 लाख (पाटणा पायरेट्स),
सुलेमान पहलवानी 10 लाख (बंगाल वारीयर्स),अमीर हुसेन बस्तानी 65 लाख 10 हजार (हरयाणा स्टीलर्स),
ओसंको 10 लाख ( जयपूर पिंक पँथर्स), रझा मीरबागेरी 26 लाख 80 हजार (जयपूर पिंक पँथर्स),जेम्स नमाबा कामवेटि 10 लाख(यूपी योद्धा),डाँग चेन ली 20 लाख (गुजरात सुपरजायंट्स),हैदर अली इकरामी 14 लाख (यु मुंबा),नागेशोर थारू 10 लाख (बंगळुरू बुल्स),लाल मोहर यादव 10 लाख (बंगळुरू बुल्स),अबुझर मिगाणी 20 लाख (यूपी योद्धा),मोहम्मद इस्माईल 10 लाख 50 हजार(हरयाणा स्टीलर्स),यांगचेन 10 लाख (गुजरात जायंट्स), रझा 10 लाख (दबंग दिल्ली),जाफरी 10 लाख (तेलगू टायटन्स).

नुकत्याच हरियाणा येथे झालेल्या 69 व्या राष्ट्रीय चांपेयिनशीप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघा मध्ये समावेश आलेल्या
भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता महाविद्यालयाचा विद्यार्थी शंकर गदाई (कर्णधार महाराष्ट्र संघ) व राहुल खाटीक (खेळाडू) यांचा प्रो-कबड्डीच्या नवव्या हंगामासाठी लिलाव झाला.त्यात शंकर गदाई साठी
30 लाख 30 हजार रुपयांची बोली लागून लिलाव झाला असून तो गुजरात जायंट्स संघासाठी खेळणार आहे.तर राहुल खाटीक साठी 10 लाख रुपयांची बोली लागून लिलाव झाला असून तो पाटणा पायरेट्स संघासाठी खेळणार आहे.तसेच राहुल धनवडे साठी 10 लाखाची बोली लागली असून तो जयपुर पिंक पँथरसाठी खेळणार आहे.

गदाई,खाटीक व धनवडे या खेळाडूंचे शिक्षण संस्था,महाविद्यालय व भेंडा ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!