माय महाराष्ट्र न्यूज:सुपरस्टार असलो म्हणून काय झालं, आम्हीही महागाईला सामोरे जात असतो. मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले आहे,
असे विधान अभिनेता सुनील शेट्टी याने केले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्याने हे विधान केलं होतं. त्याच्या या विधानावरून त्याच्यावर शेतकरी संघटना टीका करू लागल्या आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सुनील शेट्टी याच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सुनील शेट्टी याच्यावर टीका करताना म्हटलं आहे की , सुनील शेट्टींची रेस्टॉरंट आहे मग
ते लोकांना फुकट जेवण का देत नाही ? परवडत नसेल तर त्यांनी टोमॅटो खाऊ नये. सुनील शेट्टी याने टोमॅटोचा विषय जागतिक प्रश्न केल्याचीही टीका तुपकर यांनी केली आहे.सुनील शेट्टी याने त्याच्या मुलाखतीत म्हटले होते की “माझी पत्नी
एक-दोन दिवसांचा भाजीपाला घरी आणते. आम्ही जास्त करून ताज्या भाज्यांचा वापर करतो. सध्या टोमॅटोचे दर वाढत आहेत, याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले आहे. लोकांना असे वाटते की, सुपरस्टार आहेत,
त्यांच्यावर महागाईचा काय परिणाम होत नाही पण असे नसते. आम्हीही या महागाईला सामोर जात असतो” यावर तुपकर यांनी टीका करताना म्हटलंय की, टोमॅटोचा प्रश्न सुनील शेट्टींनी जागतिक प्रश्न केलाय. सुनील शेट्टींची रेस्टॉरंट आहे मग ते लोकांना फुकट जेवण
का देत नाही ? एकीकडे पब, पार्ट्यांमध्येस बारमध्ये ही मंडळी प्रचंड पैसा खर्च करतात मात्र टोमॅटो जास्त दराने खरेदी करायची वेळी आली की हे सोशल मीडियावर टाकतात. टोमॅटो काही जीवनावश्यक वस्तू नाही, टोमॅटो न खाल्ल्याने सुनील शेट्टी मरणार नाही.
परवडत नसेल तर त्यांनी खाऊ नये. शेतकऱ्यांच्या खिशात 2 पैसे जात असतील त्याचं स्वागत केलं पाहिजे.