माय महाराष्ट्र न्यूज:या वर्षी पावसाने पाठ फिरविल्याने भाजपाला पिकांना चांगला भाव आला आहे कांदा, आले, हिरवी मिरची, लसूण, कारली, गवार, भेंडी, दोडका, शेवगा, तेजीत आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीच्या इतिहासात शुक्रवारी (दि.14) रोजी पहिल्यांदा टोमॅटोला सर्वाधिक 10 हजार रुपयांचा भाव मिळाल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.
तालुक्यात जून – जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्या त्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणी मिळत नसल्याने पिके वाचवान्याचे मोठे आव्हान शेतकर्यांसमोर आहे.यामुळे भाजीपाला पिकांची आवक घटली असून भाव तेजीत आहे.
सर्वसामान्य नागरिक याबाबत ओरड करीत असले तरी शेतकरी बांधवांना असा भाव कधीतरी मिळाल्याने ते काहीसे आनंदीत आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक कमी असल्याने टोमॅटो सध्या जास्त चर्चेत आला आहे. शहरासह ग्रामीण भागात टोमॅटोचा
वापर भाजीत मोठ्या प्रमाणावर केला जातो. वाढती मागणी व कमी पुरवठा यामुळे टोमॅटोची टंचाई जाणवत आहे. शुक्रवारी राहाता बाजार समितीत ‘ना भूतो, ना भविष्यती’ असा इतिहास रचला. राहाता बाजार समिती स्थापनेपासून प्रथमच सर्वाधिक
10 हजार रुपये प्रती क्विंटल इतका भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी आनंददायी झाला आहे.तसेच कांद्यालाही सर्वाधिक 2 हजार रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. 21 हजार 458 गोणी कांद्याची आवक झाली. प्रतवारीनुसार कांदा
नंबर 1 ला 1 हजार 500 ते 2 हजार रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 850 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 850 ते 1 हजार 50 रुपये असा भाव मिळाला. जोड कांदा 100 ते 300 रुपयांप्रमाणे भाव मिळाला.