माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात पावसाला पोषक हवामान असले तरी अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अशात आगामी 5 दिवस
संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक भागांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.हवामान
विभागाने आज (ता. 16) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाड्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्या कोकणात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. संपूर्ण विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे
नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केलेले उपग्रह छायाचित्र. त्यानुसार मध्य भारत, झारखंड,
ओडिशाच्या आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट केलेले उपग्रह छायाचित्र. त्यानुसार मध्य भारत, झारखंड, ओडिशाच्या
आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.जोरदार पावसाचा इशारा :ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, गोंदिया, भंडारा
तसेच इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा :नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.मुंबईत गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा
बरसायला सुरुवात केली असून मुंबईत 17 जुलैपासून तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 17, 18 आणि 19 जुलै रोजी मुंबईसाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.