माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजप आणि शिवसेना युतीला पाठिंबा दिला. त्यांनी
आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचे देखील काही आमदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना विचारले असता
त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेस फुटणार हे निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रिपद गेल्यानं शिवसेनेची कोणतीही कोंडी होणार नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेस निश्चितपणे फुटणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रिपद गेल्यानं शिवसेनेची कोणतीही कोंडी होणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान सजंय शिरसाट हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर होते, मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काही दिलं नाही तरी मुख्यमंत्री आमचे आहेत, यात समाधान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
लवकरच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विरोधक आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडण्याची शक्यत आहे. विरोधकांकडून सरकारच्या कोंडीची शक्यता आहे. यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे पहिलं असं अधिवेश आहे, ज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आहे. सभागृहात प्रश्न मांडले पाहिजेत, सभागृहाचा त्याग करू नये. विरोधीपक्षानं भान ठेवावं की अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.